माझी लाडकी बहीण योजना - नारी शक्ती दूत | पात्रता, अर्ज प्रक्रिया, लाभ

 

माझी लाडकी बहीण योजना - नारी शक्ती दूत | पात्रता, अर्ज प्रक्रिया, लाभ

माझी लाडकी बहीण योजना - नारी शक्ती दूत

अनुक्रमणिका

·         योजना काय आहे?

·         कोणत्या महिलांना लाभ मिळेल?

·         लाभ काय आहे?

·         आवश्यक कागदपत्रे

·         ऑनलाइन अर्ज कसा करावा?

·         नारी शक्ती दूत ॲप काय आहे?

·         संपर्क साधन 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे?

महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी 'माझी लाडकी बहीण' योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक मदत करून त्यांना स्वावलंबी बनवणे हा आहे. या योजनेत पात्र महिलांना दरमहा ,५००/- रक्कम देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोणत्या महिलांना लाभ मिळेल?

·         महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या महिला

·         वय २१ ते ६५ वर्षे दरम्यान असणे आवश्यक

·         लाभार्थीचे स्वतःचे आधार कार्ड लिंक केलेले बँक खाते असणे आवश्यक आहे. तसेच, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. .५० लाखांपेक्षा जास्त नसावे.

·         राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता, आणि निराधार महिलांसह कुटुंबातील एकमेव अविवाहित महिला या योजना पात्र आहेत.

·         इतर काही पात्रता निकष लागू असू शकतात

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी

·         आधार कार्ड

·         रेशन कार्ड

·         बँक खाते पासबुक

·         मोबाईल नंबर

·         पासपोर्ट साईज फोटो

·         मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज फॉर्म

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

·         नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करा.

·         ॲपमध्ये आवश्यक माहिती भरा.

·         आवश्यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करा.

·         अर्ज सबमिट करा.

·         अर्जाची पावती डाउनलोड करा.


नारी शक्ती दूत ॲप काय आहे?

नारी शक्ती दूत हे महाराष्ट्र सरकारचे एक मोबाईल ॲप आहे. या ॲपच्या माध्यमातून महिलांना ‘माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. या ॲपमध्ये योजनेची संपूर्ण माहिती उपलब्ध असते.

संपर्क साधन

योजनेबाबत कोणतीही शंका किंवा समस्या असल्यास, आपण संबंधित सरकारी कार्यालयाशी संपर्क साधू शकता. त्यांचा संपर्क नंबर आणि पत्ता आपल्या जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असेल.

नोट:

·         ही माहिती सामान्य स्वरूपाची आहे. तपशीलवार माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइट किंवा नारी शक्ती दूत       ॲपचा वापर करा.

·         योजनेच्या नियम आणि अटींमध्ये बदल होऊ शकतात.

आपल्याला या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा.

या लेखात काहीही चूक झाली असेल तर कृपया कळवा.

 

 


Post a Comment

Previous Post Next Post